

यवतमाळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या भलतीच चर्चेत आहे. मात्र, यवतमाळमधील आर्णी येथे ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. महिलांसाठी सुरू झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले.
विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे सादर केली. तरीसुद्धा त्याच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. जाफर गफार शेख असे या तरुणाचे नाव आहे. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफरने लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) अर्ज भरला नसला तरी बँक ऑफ बडोदा या त्याच्या बँक खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहेत. या प्रकाराने जाफरही हबकून केला आहे.