Isapur Wildlife Sanctuary: टिपेश्वर, पैनगंगानंतर आता इसापूर अभयारण्याला स्वतंत्र वन्यजीव व्यवस्थापन

पुसद-हिंगोली प्रादेशिक वनक्षेत्राचा समावेश; पांढरकवडा वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश
Wildlife Sanctuary
Wildlife SanctuaryFile Photo
Published on: 
Updated on: 

Isapur Wildlife Sanctuary

उमरखेड : प्रशांत भागवत

यवतमाळ जिल्ह्यातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, टिपेश्वर आणि पैनगंगा अभयारण्यांनंतर आता इसापूर अभयारण्याच्या स्वतंत्र वन्यजीव व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी १९ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार इसापूर अभयारण्याच्या अधिसूचित क्षेत्राचा प्रत्यक्ष ताबा वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, इसापूर अभयारण्यासाठी पुसद आणि हिंगोली प्रादेशिक वन विभागांच्या ताब्यातील संबंधित वनक्षेत्राचा समावेश होणार आहे. आदेशातील तक्त्यानुसार पुसद व हिंगोली प्रादेशिक वन विभागांनी त्यांच्या ताब्यातील इसापूर अभयारण्याच्या क्षेत्राचा प्रत्यक्ष ताबा पांढरकवडा वन्यजीव विभागाकडे सुपूर्द करायचा आहे. त्यामुळे विविध प्रादेशिक वनक्षेत्रांत विखुरलेले इसापूरचे अधिसूचित क्षेत्र आता वन्यजीव शाखेच्या एकात्मिक व्यवस्थापनाखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Wildlife Sanctuary
Yavatmal Accident | तेरवीच्या कार्यक्रमाहून येताना काळाचा घाला: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार

या हस्तांतरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना अभयारण्याच्या वनखंडनिहाय क्षेत्रफळाची, सीमांची व नकाशांची संयुक्त पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष ताबा दिल्याचा दिनांक नमूद करून संयुक्त ताबा हस्तांतरणपत्रावर स्वाक्षऱ्या कराव्यात, तसेच क्षेत्रविवरण व पडताळलेले नकाशे त्यासोबत जोडावेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यालयीन व क्षेत्रीय अभिलेख, सुरू असलेल्या कामांचा तपशील, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तसेच पुढील प्रशासकीय कार्यवाहीची माहितीही ताबा घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावी लागणार आहे.

या प्रक्रियेला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे इसापूर अभयारण्याच्या व्यवस्थापनात आता प्रत्यक्ष प्रशासकीय बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुसद आणि हिंगोली प्रादेशिक वन विभागांच्या ताब्यातील क्षेत्र एकत्रित वन्यजीव व्यवस्थापनाखाली आल्याने अभयारण्याच्या संरक्षण, वन्यजीव संवर्धन, अधिवास व्यवस्थापन आणि भविष्यातील पर्यटन विकासाला अधिक संघटित दिशा मिळू शकते.

यवतमाळ जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब विशेष महत्त्वाची आहे. जिल्ह्यात टिपेश्वर आणि पैनगंगा ही वन्यजीव संवर्धनाची महत्त्वाची केंद्रे असताना इसापूर अभयारण्याच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र वन्यजीव यंत्रणा कार्यरत होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वन्यजीव अधिवासाचे संरक्षण अधिक व्यापक पातळीवर करण्याची संधी निर्माण झाली आहे. विशेषतः इसापूर जलाशय व त्याच्या परिसरातील वनक्षेत्र, जैवविविधता आणि वन्यजीव अधिवासाच्या संवर्धनाच्या दृष्टीने या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

आदेशानुसार हस्तांतरणाची संपूर्ण कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने पूर्ण करायची असून, वरिष्ठ स्तरावर निर्णय आवश्यक असल्यास ती बाब तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे इसापूर अभयारण्याच्या व्यवस्थापनाला आता प्रशासकीय स्वरूप देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

पुसद-हिंगोलीच्या वनक्षेत्रातून आकार घेणार इसापूरचे वन्यजीव व्यवस्थापन

इसापूर अभयारण्याच्या बाबतीत सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे क्षेत्र एका प्रादेशिक वन विभागापुरते मर्यादित नसून पुसद व हिंगोली प्रादेशिक वन विभागांच्या ताब्यातील संबंधित क्षेत्राचा त्यात समावेश आहे. या क्षेत्राचा ताबा पांढरकवडा वन्यजीव विभागाकडे गेल्यानंतर इसापूरसाठी वन्यजीव संवर्धनाची स्वतंत्र प्रशासकीय चौकट अधिक स्पष्ट होणार आहे. यामुळे भविष्यात इसापूरची स्वतंत्र वन्यजीव ओळख अधिक ठळक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Wildlife Sanctuary
MSEDCL Action Yavatmal | यवतमाळ जिल्ह्यातील सातशे ग्राहकांचा वीजपुरवठा तोडला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.