Yavatmal Accident | तेरवीच्या कार्यक्रमाहून येताना काळाचा घाला: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार

भीषण अपघातात पतीचा जागीच तर गंभीर जखमी पत्नीचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू
Truck Accident
Truck Accident File Photo
Published on: 
Updated on: 

Wani Shindola Road Truck Hits Bike Couple Killed

यवतमाळ : तेरवीचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे निघालेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा जागीच तर गंभीर जखमी पत्नीचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 17) रात्री वणी तालुक्यातील शिंदोला मार्गावर ही दुर्दैवी घटना घडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोडशी येथील कवडू कंडे (वय 45) आणि त्यांची पत्नी मंजुषा कंडे (वय 40) हे मंगळवारी वणी तालुक्यातील शिवणी येथे  तेरवीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या दरम्यान हे दांपत्य आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, शिदोला मार्गावर विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रक आणि त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली.

Truck Accident
Ganja Seized Yavatmal | सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

या अपघातात कवडू कंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मंजुषा या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. या अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कोडशीसह परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.