

यवतमाळ : रात्री शेताची राखण करणाऱ्या शेतकऱ्याचा मळ्यावरून पडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी सावळी सदोबा परिसरातील दातोडी येथे उघडकीस आली.
सीताराम डोमा पवार (वय ६०) रा. माळेगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पवार कुटुंबियांनी दातोडी येथे नदीकाठी असलेले शेत रब्बी पिकासाठी मक्त्याने घेतले होते. त्या शेतात रात्री पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सीताराम पवार हे शेतातच होते. त्यांना मळ्यावर झोप लागली.
दरम्यान मंगळवारी सकाळी ते मळ्यावरून खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सावळी सदोबा पोलिस चौकीतील उपनिरीक्षक बाष्ठेवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.