Yavatmal Crime | बनावट लग्न जुळवून आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीचा ‘म्होरक्या’ जेरबंद

अनेक फसवणूक प्रकरणांचा पर्दाफाश होण्याची शक्यता
 Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

Fake Marriage Fraud

यवतमाळ : बनावट लग्न जुळवून आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीचा ‘म्होरक्या’ अखेर पुसद पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्या अटकेमुळे अनेक फसवणूक प्रकरणांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक सटवा ठमके (रा. कासोळा ता. महागाव) हा बनावट ओळखी व खोट्या आश्वासनांच्या आधारे लग्नाची गाठ घालण्याचे नाटक करत होता. विश्वास संपादन करून तो पीडितांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने व इतर आर्थिक लाभ उकळत होता.

 Crime News
Yavatmal News : कॅन्सरच्या भीतीने बस चालकाने संपवले जीवन

लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेकांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. या प्रकरणात आरोपी बराच काळ फरार होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती व सततच्या पाठपुराव्याच्या आधारे त्याचा माग काढत अखेर त्याला अटक केली. आरोपीकडून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

यामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अमोल जाधव, तसेच हेड कॉन्स्टेबल विजय काळे व त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.

 Crime News
Yavatmal Robbery | यवतमाळ : धाडसी घरफोडी, तब्बल 14 लाखांचा ऐवज लंपास

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत, लग्न जुळवताना योग्य पडताळणी करण्याचे तसेच संशयास्पद व्यवहार त्वरित कळविण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news