

पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात कोकडा रोगाची लागण झाल्याने शेतकरी मिरचीचे पीक उपटून टाकत आहेत. पारध येथील शेतकरी मंगेश देशमुख यांनी एक एकरवरील मिरची कोकडा रोगाची लागण झाल्याने उपटून फेकल्याने त्यांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, पारध, आन्वा, वालसावंगीसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मे महिन्यात मिरचीची लागवड होते. भोकरदन तालुक्यात जवळपास एक लाख हेक्टरवर यावर्षी मिरचीची लागवड करण्यात आली आहे.
मिरच्या सदोष बियाणांपासून मिरचीचे रोपे तयार करण्यात आल्याने मिरची पिकावर कोकडा रोगाची लागण झाल्याची माहिती शेतकर्यांनी दिली.तालुक्यात सध्या मिरची तोडणीला आली आहे. कोकडा रोगामुळे 8 ते 9 हजार रुपये क्विटलची मिरची 3 ते 4 हजार रुपये क्विंटलने विक्री होत आहे.मिरचीवर कोकडा रोगाची लागण झाल्यानंतर कृषी विभागाने केले नसल्याचा आरोप आहे.
पारध येथील मंगेश देशमुख या शेतकर्याने एक एकरवर मिरचीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना एक लाख आठ हजार रुपये खर्च आला हेाता.मिरचीवर कोकडा पडल्याने विविध औषधी फवारूनही उपायोग होत नसल्याने त्यांनी एक एकरवरील मिरची उपटून फेकली.