Marathwada farmer death: मराठवाड्यात सहा महिन्यांत 501 शेतकऱ्यांनी जीवन संपवले

वर्षभरात मराठवाड्यात 948 शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली.
Farmer Death Representative Image
Farmer Death Representative ImagePudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात नव्या वर्षातही शेतकरी जीवन संपवण्याचे सत्र कायम आहे. मागील सहा महिन्यांत विभागातील तब्बल 501 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. सर्वाधिक 124 शेतक-यांनी जीवन संपवण्याच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. मागील वर्षभरात जिल्ह्यात 948 शेतक-यांनी जीवन संपवले होते.

Farmer Death Representative Image
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरात थरारनाट्य : बालसुधारगृहातून 9 अल्पवयीन मुलींचे सिनेस्टाईल पलायन

नापिकी, कर्जबाजारीपणा, पावसाचा लहरीपणा, शेतमालाला मिळणारा कमी भाव आदी कारणांमुळे मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून शेतकरी जीवन संपवण्याच्या घटना घडत आहेत. अनेक शेतकरी नाइलाजाने गळफास लावून, विष घेऊन जीवन संपवण्याचा मार्ग निवडत आहेत. मागील वर्षभरात मराठवाड्यात 948 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. आता सन 2025 मध्येही शेतकरी जीवन संपवण्याचा घटनांमध्ये घट झालेली नाही.

मागील सहा महिन्यांत विभागात शेतक-यांनी जीवन संपवण्याचा घटनांनी पाचशेची संख्या ओलांडली आहे. विभागात जानेवारी महिन्यात 88 शेतकर्‍यांनी जीवन संपवले. फेब्रुवारी महिन्यात 75, मार्च महिन्यात 110, एप्रिल महिन्यात 89, मे महिन्यात 76 तर जून महिन्यात 63 शेतकर्‍यांनी जीवन संपवले . यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 124 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 87 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अन्य जिल्ह्यातही शेतक-यांनी जीवन संपवण्याचे सत्र कायम आहे. आतापर्यंत 297 कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. 60 प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत, तर 144 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Farmer Death Representative Image
Sambhaji Nagar News : होय, महिलाही पुरुषावर अत्याचार करतात

नांदेड दुसर्‍या क्रमांकावर

1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या 12 महिन्यांत 948 शेतकर्‍यांनी जीवन संपवले. यात बीड जिल्ह्यात 205 तर नांदेड जिल्ह्यात 167, तर छत्रपती संभाजीनगरात 151 शेतकर्‍यांनी जीवन संपवले. तर विभागात डिसेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे 109 जणांनी जीवन संपवल्याची नोंद आहे.

शेतक-यांनी जीवन संपवले (जानेवारी ते 26 जून 2025 अखेर)

जिल्हा - जीवन संपवल्याच्या घटना

छत्रपती संभाजीनगर - 87

जालना - 28

परभणी - 61

हिंगोली - 31

नांदेड - 72

बीड - 124

लातूर - 36

धाराशिव - 62

एकूण - 501

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news