आदिवासी सोसायटी परिसरातच प्रेमदास पवार याचे वास्तव्य होते. त्याचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रेमदासचा मृतदेह पाहून नातेवाइकांनी हंबरडा फोडला. नंतर तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली. पोलिसांनी हा जमाव बाजूला करीत प्रेमदासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला. हा खून नेमका कशातून झाला, संशयित कोण याबाबत जमलेल्या गर्दीमध्ये चर्चा सुरू झाली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी तर ही घटना घडली नाही ना असाही संशय वर्तविला जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.