यवतमाळ : वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणाचा खून

यवतमाळ :  वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणाचा खून
Published on
Updated on

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : येथील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात एका युवकाचा दगड डोक्यात घालून खून करण्यात आला. तर येळाबारा येथील वाघाडी धरणात दुसऱ्या एकाचा गळा आवळून खून करण्यात आल्‍याची घटना उघडकीस आली.  या दोन घटनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (वय ३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर सुनीलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. मृताचा लहान भाऊ अनिल भीमराव निंबोरे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे करीत आहेत.

येळाबारा येथील खून हा गावातीलच व्यक्तीनी केला असावा असा अंदाज आहे. या खुनात आरोपींची संख्या दोनपेक्षा जास्त आहे. त्यांनी गळा आवळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह धरणात टाकला होता. नेमका कुठल्या कारणाने हा खून झाला, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

युवकाचा डोक्यात दगड घालून खून

यवतमाळातील पांढरकवडा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात अज्ञात युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी उघड झाली. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मृत हा कळंब शहरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अजूनही त्याची खात्री झालेली नाही. या प्रकरणात संशयित म्हणून पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. मृतक व संशयित हे दोघेही गांजाचे व्यसन करीत होते. परिसरात सोबतच राहत होते. रात्री त्यांच्यात गांजा पिल्यानंतर वाद झाला. या वादात संशयिताने दगड मृताच्या डोक्यात घातला, असे सांगितले जाते. याप्रकरणी शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news