यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : सोसायटी निवडणुकीत मिळविलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करुन मुकुटबन येथे पेढे आणण्यासाठी गेलेल्या उपसरपंचावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी झरी तालुक्यातील मुकुटबन येथे घडली.
मुकुटबन अंतर्गत येडशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भोला नगराळे यांची आई सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उभी होती. या निवडणुकीत भोला नगराळे यांच्या आईसह त्यांच्या पॅनेलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले. सायंकाळी विजयी उमेदवारांनी मोठ्या उत्साहात जल्लोषही साजरा केला. उपसरपंच नगराळे यांना तर मोठा आनंद झाला होता. १३ सदस्य निवडून आले . सोबत बोला यांची ६५ वर्षीय आईसुद्धा चांगल्या मताधिक्याने निवडून आली होती.
त्यामुळेच सोमवारी सकाळीच ते मोटरसायकलवरून मुकुटबनला पेढे आणण्यासाठी निघाले. आडगावमार्गे येडशीकडे निघाले होते. यावेळी रस्त्याशेजारील झाडावरील मधमाशांचा पोळ अचानक उठले. तो घोंगावत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात असतानाच या पोळ्याच्या जाळ्यात सापडले. मधमाशांनी उपसरपंच भोला नगराळे यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की नगराळे जागेवरच बेशुद्ध पडले. रस्त्यावरून जाणार्या काहीजणांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. नगराळे यांना मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना वणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून भोला नगराळे यांना मृत घोषित केले. उपसरपंच भोला नगराळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचलंत का ?