यवतमाळ : नाल्यातून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले

 हत्या
हत्या
Published on: 
Updated on: 

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या एका ७२ वर्षीय वृद्धाचा व एका ४७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शोधण्यासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकासह पोलीस आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

महागाव तालुक्यातील हिवरा येथील रामा राघोजी मेटकर हे कपूरवाडी शेतशिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. परंतु रात्री घरी न परतल्याने मुलांनी ग्रामस्थांच्या मदतीने वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु रात्री उशिरापर्यंत पत्ता लागला नाही. शुक्रवारी हिवरा ते काबरवाडी नदीकाठावर शोध घेतला असता काही अंतरावर पूस नदीच्या पात्रात रामा यांचा मृतदेह तरंगताना आढळला.

पोलीस पाटील प्रवीण कदम व महसूल कर्मचारी जीवन जाधव यांनी याबाबतची माहिती महागाव पोलिसांना कळविली. या दरम्यान दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील २७ जुलैला शेतात कामाला गेलेली वंदना प्रकाश जाधव ही महिलाही खरकडी नाल्यात वाहून गेली होती. गुरुवारी दुपारी सुभाष ठाकरे यांच्या शेताजवळील भागात त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news