सिंचन घोटाळ्याचे ७० हजार कोटी कुठे ठेवले? वड्डेटीवारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

सिंचन घोटाळ्याचे ७० हजार कोटी कुठे ठेवले? वड्डेटीवारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सहा दिवसांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. भ्रष्टाचाराचा आरोप असणारेच सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी आता कुठे नेवून ठेवलेत, असा खडा सवाल विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला. चंद्रपूर शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि.२१) आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते भाजपकरीता पवित्र कसे झाले. चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी, खूप मोठा सिंचन घोटाळा आहे, खूप पुरावे आहेत, असे म्हटले होते. आता घोटाळ्यातील अर्धे मिळाले की, व्याज मिळाला, असा टोला लगावून ७० हजार कोटी कुठे नेवून ठेवलेत असा प्रश्न केला.

राज्यात आता दोन अलीबाबा आणि ८० चोर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला पण आता त्यांना रात्रभर झोप लागत नाही. खुर्ची जाऊ नये याकरीता कधी कधी स्वप्नात खुर्ची धरून ठेवतात. रोज खुर्चीकडे टक लावून पाहत आहेत. ही खुर्ची कधी खाली होते आणि या खुर्चीवर आम्ही कधी बसतो, असे काहींना वाटत आहे. राज्याच्या तिजोरीची लूट चालली असून राज्याचे वाटोळे होत आहेत. काँग्रेसच्या काळात ऑनलाईन भरतीचे १०० शंभर रूपये घेतले जात होते. आता ९०० रूपये घेतले जात आहेत. गोरगरीबांचे मुले ऐवढी फी कसे भरणार. त्यावेळी विद्यमान पालकमंत्री बोलत होते. आता एक शब्दही काढत नाहीत. उलट समर्थन करतात. बेराजगारांना लुटण्याचे पाप सत्ताधारी करीत आहेत. जमा होणाऱ्या पैशाचा हिस्सा कोठे जातो. याचा जाब राज्यातील जनता सत्ताऱ्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

राहूल गांधींच्या पाठीशी उभे रहा

मुख्यमंत्री किंवा मंत्री होणे माझ्यासाठी महत्वाचे नाही तर देशातील हुकूमशाहीला खाली खेचणे महत्वाचे आहे. याकरीता राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांनी केले. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत लोकशाही व संविधान वाचविण्याकरीता नागरिकांनी मतदान करावे. राहुल यांनी भारत जोडो यात्रेत साडेतीन हजार कि. मी. चा प्रवास केला. शेतकरी शेजमजूर व महिला पुरूष व विविध घटकांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यामुळे या देशाचे पंतप्रधान राहुल गांधींना घाबरले आहेत. स्मृतीताईंनी फ्लाईंग किसच्या मुद्यावरून राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी केलेल्या प्रश्नांचे उत्तर पंतप्रधान देऊ शकले नाहीत. त्यामुळे स्मृती ताईंनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र करून धिंड काढली जाते. महिलांवर अत्याचर केला जातो. त्यावर त्या काही बोलल्या नाहीत. देशात संविधान संपविण्याचे काम सुरू झाले आहे, जनतेचे काम केले असते तर त्यांच्यावर पक्ष फोडाफोडीची वेळ आली नसती, अशी टीका वड्डेटीवार यांनी केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news