

Washim Jewelry Theft Prevention
वाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात एस टी प्रवासामध्ये महिलांच्या होत असलेल्या दाग-दागिण्याची चोरी रोखण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेळके व त्यांचे अंमलदार तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे वाहतूक अंमलदार यांनी जिल्ह्यामधील विविध रस्त्यांवर एस.टी बस थांबवून बस मधील प्रवाशी महिलांना त्यांचे दाग-दागिने व मौल्यवान वस्तु यांची चोरी होत असल्याचे व ते सुरक्षित आहेत का ? याची खातरजमा करण्याचे सांगितले.
यासाठी पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी बस स्टँड चौक, मानोरा रोड, खेर्डा टोलनाका, अमरावती रोड, शिरपूर रोड, तोंडगाव टोलनाका हिंगोली रोड, मालेगाव रोड, सावरगाव रोड, मेडशी रोड, जागमाथा, समृद्धी महामार्ग जवळ शेलू बाजार, मानोरा ते मंगरुळपीर रोड, लालमाती धावा जवळ, अनसिंग रोड, वाशिम अशा विविध पोलिसांनी जनजागृती केली.
तसेच पो.नि संतोष शेळके व स.पो.नि नाईक असे वाशिम शहर बसस्थानक येथे जाऊन तेथील बस स्थानक प्रमुख गजानन इंगोले यांची भेट घेऊन त्यांना चोरीच्या घटनेबाबत चर्चा करुन त्यांना बस स्टँडवर वेळोवेळी या बाबत दक्षता घेण्याच्या सुचना केल्या, या मोहिमेमुळे महिलांचे दाग-दागिने चोरी होण्यापासून प्रतिबंध होईल, असा विश्वास वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष शेळके यांनी व्यक्त केला.