Washim News | नेपाळमध्ये अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील पर्यटकांनी आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

जिल्हा प्रशासनाचे आवाहन; पर्यटक व नातेवाईकांनी तातडीने माहिती देण्याचे आवाहन
Disaster Management  Help Line
Disaster Management Help LinePudhari
Published on
Updated on

Tourist Rescue Nepal

वाशिम : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये असलेल्या विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

वाशिम जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Disaster Management  Help Line
Washim news: जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवरील सोलर यंत्रणा धूळखात; लाखो रुपयांचा खर्च वाया?

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम
मोबाईल : ९०४९५८८९६९३

वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी वरील नंबरवर संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news