Washim Toll Plaza Seized| शेतकऱ्याला भूसंपादनाचा मोबदला न दिल्याने तोंडगाव टोल प्लाझा केला जप्त

वाशीम जिल्ह्यातील तोंडगाव-धूमका राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर जप्तीची कारवाई
Tondgaon Dhumka National Highway Toll Plaza Seized
Tondgaon Dhumka National Highway Toll PlazaPudhari
Published on
Updated on

Tondgaon Dhumka National Highway Toll Plaza Seized

वाशीम : वाशीम जिल्ह्यातील तोंडगाव-धूमका राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर शुक्रवारी (दि.१०) न्यायालयाच्या आदेशानुसार जप्ती अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत टोल प्लाझा जप्त केला. जप्ती अधिकारी जितेंद्र नेमाने यांनी टोल प्लाझावर जप्तीची नोटीस चिटकवून दवंडीद्वारे जप्तीची कारवाई अधिकृतपणे जाहीर केली. या घटनेमुळे टोल प्रशासनात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृषक जमिनीतून राष्ट्रीय महामार्गाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, भूसंपादनाचा मोबदला देताना त्यांच्या जमिनीतील रस्ते, खुली जागा तसेच प्लॉटच्या किमतीचा योग्य विचार करण्यात आला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वाढीव मोबदल्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

Tondgaon Dhumka National Highway Toll Plaza Seized
Washim News : पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांचा दावा ग्राह्य धरत ६ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला अदा करण्याचे आदेश दिले. मात्र, आदेशानंतरही मोबदल्याची रक्कम अदा न झाल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी संबंधित टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले.

त्या आदेशाची अंमलबजावणी करत शुक्रवारी जप्ती अधिकाऱ्यांनी तोंडगाव टोल प्लाझावर प्रत्यक्ष जाऊन जप्तीची नोटीस चिटकवली. तसेच दवंडी देऊन मालमत्ता न्यायालयाच्या ताब्यात घेतल्याची घोषणा करण्यात आली. संपूर्ण कारवाई पंचनामा करून आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत पार पाडण्यात आली.

Tondgaon Dhumka National Highway Toll Plaza Seized
Washim Congress | शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला शासनाने आळा घालावा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

या कारवाईमुळे संबंधित प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या आदेशाची वेळेत अंमलबजावणी न झाल्यास कायदेशीर कारवाई किती कठोर होऊ शकते, याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news