

Washim Municipal Tax
वाशिम: वाशिम शहरातील करदात्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नगरपरिषद वाशिम मार्फत राबविण्यात येणारी कर संदर्भातील सदस्यत्व योजना एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे.
शहरातील अनेक नागरिकांची तक्रार व या योजनेची पुरेशी माहिती नसल्याचा अभाव असल्यामुळे हे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनादरम्यान भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश खंडाळकर व शहर सरचिटणीस सुनील तापडिया हे उपस्थित होते.
या निर्णयामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या थकबाकी कराची रक्कम भरण्यास सोयीस्कर होणार असून नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. हा दिलासा आमदार शाम खोडे यांच्या पुढाकारातून व भाजपा शहराध्यक्ष मनिष मंत्री यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाला आहे.
याचा लाभ वाशिम शहरातील अनेक सरकारी कार्यालये, मोठे व्यापार संकुल तसेच शहरातील वास्तव्य करणारे सर्व रहिवासी यांना होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.