

Washim family dispute murder case
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गावात एक धक्कादायक घटना आज (दि.8) समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. एवढेच नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर त्या व्यक्तीनेही गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गावातील 41 वर्षीय हिंमत महादेव धोंगडे यांनी त्यांची पत्नी कल्पना धोंगडे (वय 37) यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर हिंमत धोंगडे यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृतदेहांचे पंचनामे करण्यात आले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, कौटुंबिक वाद इतका कसा वाढला, हा चर्चेचा विषय ठरला आहे.