Washim News | शहरात दगडफेक प्रकरणात सहा आरोपी जेरबंद

Washim Violence News | जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची पत्रकार परिषद
Washim Violence News
जिल्हा पोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषद(Pudhari Photo)
Published on
Updated on

Washim Violence News

वाशिम : शहरातील पाटनी चौकात रात्री किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या वादात झाले. दि. 12 मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजता दोन व्यक्तींमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर अफवा पसरल्या आणि दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण झाला. रात्री उशिरा काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली.

या घटनेबाबत पत्रकार परिषदे मध्ये माहिती देताना वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुज तारे म्हणाले, काल दुपारी १२ वाजता पाटनी चौकात एका व्यक्तीने दुसऱ्याला किरकोळ वादात मारहाण केली. त्यानंतर समाजात काही अफवा पसरल्या आणि दोन्ही गट आमनेसामने आले. पोलिसांना याची पूर्वकल्पना होती आणि वेळेवर घटनास्थळी पोहोचून जमाव पांगवण्यात आला.

Washim Violence News
Washim Crime : वरली मटका जुगार खेळणाऱ्यांवर धडक कारवाई

आत्तापर्यंत २० ते २५ आरोपींची ओळख पटली असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेकीच्या व्हिडिओंच्या आधारे आणखी आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.शहरात अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिला.

Washim Violence News
Washim Breaking | भर दिवसा वाशीम शहरात व्यापाऱ्याचे १ कोटी २०लाख लुटले

दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news