

Illegal matka betting Washim
वाशिम: उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांना दि. 08 मे रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, शिरपूर बसस्टॅन्ड समोर एका सिमेंट विटाच्या खोलीमध्ये तसेच बसस्टँडच्या जवळील सिमेंट विटाच्यावर टिन पत्रे असलेल्या खोलीमध्ये काही व्यक्ती वरली मटक्याचा जुगार खेळत आहेत. अशा प्राप्त माहितीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल (भा.पो.से.) यांनी त्यांच्या पथकासह बस स्टॅंड जवळील नमूद दोन ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी मिलन, कल्याण, टाईम बाजार नावाच्या जुगारावर लोक पैश्याचे जुगार खेळताना आढळून आले.
आरोपीकडून नगदी 31,280/-रुपये, वरली मटक्याच्या चिठ्या 3 बॉल पेन कि. 15/-रु, 2 मो.सा. किं. 95,000/-रुपये 17 मोबाईल एकूण किंमत 1,71,500/-रुपये, असा एकूण 2,97,795/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा अवैध वरली मटक्याचा जुगार चालविणारे व जुगार खेळणा-या एकूण 26 आरोपींवर पो.स्टे.शिरपूर येथे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.
1. किसन केशव घोडमोडे 2. सतिष श्रीराम चव्हाण 3. संतोष लक्ष्मण शिखरे 4. परसराम राजाराम कव्हर 5. सुखदेव किसन भगत 6. उत्तम देवबा सावळे 7. मुसिंग माणिक पवार 8. किसन आनंदा राऊत 9. सरदार खाँ अब्दुल्ला खाँ 10. ज्ञानेश्वर गंगाराम भोसले 11. विजय निवृत्ती अंभोरे 12. रवि वानखेडे 13. दिपक अंभोरे 14. कार्तीक ऑन मालेगाव 15. शेख आबेद शेख दादामिया 16. विष्णु रामकृष्ण खंदारे 17. कैलास विश्वनाथ शिंदे 18. गजानन संतोष वाकोडे 19. शिवाजी उर्फ प्रशांत भास्करराव देशमुख 20. रिजवान अहमद तौफिक अहमद 21. हसन उर्फ शहिद मोहम्मद रेघीवाले 22. वजिर शहा कडू शहा 23. गंगाराम किसन साबळे 24. शंकर दत्तराव देशमुख 25. आशु शेठ 26. प्रविण बबन गायकवाड.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस अधिक्षक नवदीप अग्रवाल, पोहेकाँ हरिभाऊ कालापाड, पोहेका अरविंद राठोड, पोकाँ स्वप्नील शेळके, पोकाँ सलमान नंदावाले, चापोकाँ चंचल वानखेडे यांनी केली आहे.