

वाशीम : राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना सुरू आहे. या योजनेत वाशिम जिल्ह्यातील कलावंतांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. आपली 'कला हेच समजून जीवन' आयुष्यभर लोककला करणाऱ्या जातिवंत आणि पारंपरिक लोककला साहित्य जपणाऱ्या लोक कलाकाराचा व जास्त वय असलेल्या वयोवृद्ध कलावंतांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे राजश्री शाहू महाराज कलावंत मानधन योजनेचे सदस्य खंडेराव मुंढे यांनी सांगितले.
दलालांच्या फसवणुकीचा प्रकार उघड झाला असून राजश्री शाहू महाराज कलावंत मानधन सन्मान योजने मध्ये या अगोदर काही दलालांनी कलावंतांची फसवणूक केल्याचे पाहायला मिळाले. बरेच कलावंता कडून रोख रक्कम घेतल्याचे पितळ उघडे पडले.
ज्या कलावंतांनी पैसे दिले. त्यांचे नाव फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये पात्र न झाल्याने पितळ उघडे पडले. तसेच वाशिम जिल्ह्यातील कलावंतांना मानधन सुरू करून देतो असे सांगून मोठ्या प्रमाणात प्रमाणात दलाल सक्रिय झाले आहेत. या दलाला पासून कलावंतांनी सावध रहावे, असे आवाहन खंडेराव मुंढे (सदस्य) यांनी केले आहे.