

Risod Missing Woman
वाशिम : रिसोड शहरातील २६ वर्षीय विवाहित महिला कांचन शुभम गायकवाड (वय २६) ही दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बेपत्ता झाल्याची नोंद रिसोड पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.
पोलिसांकडील नोंदीनुसार, बेपत्ता महिलेचे नाव कांचन शुभम गायकवाड असून तिचे वय २६ वर्षे आहे. ती रिसोड शहरातील शिवाजी नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती नोंदीत नमूद आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन ही घरातून निघून गेल्यानंतर परत आली नाही. नातेवाईक व परिचितांकडे तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नसल्याने पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. याशिवाय विस्तृत सर्व घटनेचा तपशील मुद्दे नमूद केले आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन : वय २६ वर्षे, उंची अंदाजे ४ फूट ७ इंच, अंगकाठी मध्यम असून ती लाल रंगाची साडी व ब्लाऊज परिधान करून घराबाहेर पडली असल्याची माहिती पोलिस नोंदीत आहे. तिच्या सोबत कर्तव्य नावाचा चार वर्षचा मुलगा आहे.
या दोघांबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने रिसोड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून याशिवाय शुभम गायकवाड महिलेचे पती यांनी माहिती देणाऱ्या व्यक्तीला 20 हजार रुपये बक्षीस म्हणून देण्याचेही सोशल मीडियावर एका पोस्ट जारी केले आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे; बेपत्ता मायलेकीचा शोध घेण्यासाठी यंत्रणा अधिक गतिमान करण्याची गरज!
या प्रकरणाकडे केवळ हरवलेल्या व्यक्तीची नोंद म्हणून न पाहता, महिला व चार वर्षांच्या बालकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन शोधमोहीम अधिक व्यापक करावी, अशी मागणी होत आहे.नागरिकांनी अफवा न पसरवता मिळालेली कोणतीही खात्रीशीर माहिती तातडीने पोलिसांना किंवा कुटुंबीयांना द्यावी.