Washim Earthquake | वाशिम, रिसोडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के: नागरिकांनी सतर्क राहावे

हिंगोली जिल्ह्यात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद
Hingoli Earthquake
Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्का; नागरिकांमध्ये भीतीFile Photo
Published on
Updated on

वाशिम : हिंगोली जिल्ह्यात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद नांदेड येथील भूकंप मापन केंद्राने केली आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के वाशिम आणि रिसोड तालुक्यातील काही भागांमध्येही जाणवले. आज (दि. ११) सकाळी सुमारे ८. ४४ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणतीही घबराट बाळगू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही.

Hingoli Earthquake
Washim news | आईचा एकुलता एक आधार हरपला; २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन

तसेच, नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडूनच घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी:

काय करावे:
१. शांत राहावे व घाबरू नये.
२. घरात असल्यास मजबूत टेबल, पलंग किंवा भिंतीच्या कोपऱ्याजवळ आसरा घ्यावा.
३. डोक्याचे संरक्षण करावे.
४. भूकंप थांबल्यानंतर सुरक्षितपणे मोकळ्या जागेत जावे.
५. शक्य असल्यास गॅस व वीज पुरवठा बंद करावा.
६. प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

काय करू नये:
१. धावपळ करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये.
२. लिफ्टचा वापर टाळावा.
३. अफवा पसरवू नयेत किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये.
४. विजेच्या तारा, इमारतींमधील भेगा किंवा कमकुवत संरचनांच्या जवळ जाऊ नये.
५. अनावश्यक फोन करून नेटवर्क व्यस्त ठेवू नये.

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क:
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत – ९०४९५८९६९३
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष – ०७२५२-२३४२३८

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news