Washim Railway : वाशिम परिसरात रेल्वे रुळावर रील बनवणाऱ्या तरुणावर कारवाई

मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील तरुण ताब्यात
Washim Railway Police Action
Washim Railway Police Action Pudhari
Published on
Updated on

Washim Railway Police Action

वाशिम : रेल्वे रुळावर उभे राहून रील बनविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई केली. ६ सप्टेंबररोजी सकाळी ११.०३ वाजता रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली होती.

वाशिम रेल्वे स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे रुळावर अनधिकृतपणे प्रवेश करून सोशल मीडिया रील बनविल्याची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी रेल्वे कायदा १९८९ मधील कलम १४७ व १४५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३०३/२६ दाखल करण्यात आला.

Washim Railway Police Action
Washim News | नेपाळमध्ये अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील पर्यटकांनी आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आरपीएफचे एएसआयपीएफ सलिम खान यांनी तपास व चौकशी सुरू केली. सोशल मीडिया खात्याच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. अमोल यादव नवघरे (वय २९, रा. पांगरी नवघरे, ता. मालेगाव, जि. वाशिम) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले.

त्यानंतर आरपीएफ पथकाने पांगरी नवघरे येथे जाऊन अमोल नवघरे याला ताब्यात घेत आरपीएफ पोस्ट, वाशिम येथे आणले. चौकशी पूर्ण केल्यानंतर रेल्वे कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्यात आली. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावून त्याची सुटका करण्यात आली.

रेल्वे रुळावर विनापरवानगी प्रवेश करून रील अथवा व्हिडिओ बनविणे धोकादायक असून अशा प्रकारांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news