

Risod Malegaon Highway Accident
वाशीम : प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्सिमो वाहनाचा टायर अचानक फुटल्याने भीषण अपघात घडला. ही घटना रिसोड मालेगाव मार्गावर बुधवारी (दि. 24) सकाळी 9:45 वाजता बिबखेडा जवळ घडली. टायर फुटल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने तब्बल चार पलट्या घेतल्या. या अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.
संतोष नारायण गवळी (वय 36, रा. नावली, ता. रिसोड, जि. वाशिम) असे मृतकाचे नाव आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालय तर काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयातील 6 जखमींना पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये 6 महिलांसह एक लहान मुलाचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबद्दल माहिती अशी की भुंगावरून खाजगी प्रवासी वाहतूक करणारा एम एच 26 एस 18 41 महिंद्रा मॅक्स हे वाहन डोणगाव वरून रिसोड कडे ग्रामीण भागातील प्रवासी घेऊन रिसोड कडे येत असताना बिबखेडा जवळ टायर फुटून सदर अपघात घडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. व उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघाताचा पुढील तपास सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
संतोष नारायण गवळी हे आपली पत्नी आरती व पाच वर्षीय मुलगा गणेश सोबत नावली वरून रिसोड कडे येत होते. रिसोडपासून चार किलोमीटरवर सदर अपघात झाला. व या अपघातामध्ये संतोष गवळी यांने आपले प्राण सोडले. आपल्या नजरेसमोरच पतीने सोडलेले प्राण बघता आरतीने आपला मुलगा गणेशला कवटाळून एकच टाहो फोडला. यावेळी घटनास्थळी उपस्थिततांची डोळेही पानावले.
अपघातातील जखमी
परमेश्वर बबन शिंदे वय 50 वर्षे राहणार नावली तालुका रिसोड,लता दीपक खरात वय 42 वर्षे राहणार नावली तालुका रिसोड, शोभा परमेश्वर कोरडे व 35 वर्षे राहणार मांगुळझानक ता.रिसोड, सतीश जगन्नाथ भिसे वय 38 वर्ष राहणार अंचळ तालुका रिसोड, देविदास यादव खंडारे वय 52 वर्ष राहणार नेतंसा तालुका रिसोड, कृष्णा रामेश्वर कोरडे वय 16 वर्षे राहणार मांगुळझनक तालुका रिसोड, गणेश संतोष गवळी वय 5 वर्षे राहणार नवली तालुका रिसोड, आरती संतोष गवळी वय 27 वर्ष राहणार नावली तालुका रिसोड या जखमींचा रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर यातील सतीश भिसे व गणेश गवळी वगळता सर्व जखमींना वाशिम येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जखमी पैकी अन्य गोदावरी शामराव मोरे वय 72 वर्षे राहणार मांगवाडी तालुका रिसोड,लताबाई दत्तराव रायवाडे वय 50 वर्षे राहणार पळशी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली, दीपक रामभाऊ खरात वय 45 वर्षे राहणार नावली तालुका रिसोड, पंकज भास्कर खरात वय 27 वर्षे राहणार नावली तालुका रिसोड, शारदा बळीराम वाघ वय 55 वर्षे राहणार गोवर्धन ता.रिसोड, बळीराम पंढरीनाथ राव वाघ वय 59 राहणार गोवर्धन तालुका रिसोड यांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.