Washim News | मालेगाव तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था; शेतमालाची गाडी चिखलात अडकली

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन मार्गे तामसी ते वाकद ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण
Malegaon bad road condition issue
तामसी ते वाकद परिसरात चिखलात अडकलेले वाहन Pudhari
Published on
Updated on

Malegaon bad road condition issue

वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन मार्गे तामसी ते वाकद ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खोल खड्डे पडले असून, सततच्या पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. याच कारणामुळे शेतकऱ्याच्या मालाने भरलेली गाडी रस्त्यातच अडकून पडली.

ही घटना तामसी ते वाकद परिसरातील असून, शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीकडे घेऊन जात असताना गाडी चिखलात फसली. ही गाडी इतकी खोलवर फसली की या गाडी काढण्यासाठी पाठीमागून एक ट्रॅक्टर व समोरून एक ट्रॅक्टर लावून गाडी बाहेर काढावी लागली. या गाडीतील शेत माल वेळेत बाजारात पोहोचू न शकल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Malegaon bad road condition issue
Washim Crime | वाशिम हादरले! कौटुंबिक वादातून पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या: पतीने गळफास घेऊन संपविले जीवन

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत म्हटले की, “गावोगावी रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही दुरुस्ती होत नाही. शेतकऱ्यांना आपल्या कष्टाच्या मालाची वाहतूक करणे अवघड झाले आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news