Washim Crime | दोन तलवारींसह आरोपी गजाआड: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाकद परिसरात तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
Illegal Weapons Seized Washim
Illegal Weapons Seized Washim Pudhari
Published on
Updated on

Illegal Weapons Seized Washim

वाशिम: वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाकद परिसरात तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या गणेश रामराव मुके उर्फ शोकाभाई याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या असून, पोलिसांनी त्याची गुंडगिरी मोडीत काढली आहे.

शुक्रवारी (दि. ८) स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली की, वाकद गावात एक युवक तलवारीसह वावरत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव आणि त्यांच्या पथकाने वेगाने सूत्रे हलवली. कोणताही गाजावाजा न करता पोलिसांनी वाकद परिसरात सापळा रचला आणि संशयित शोकाभाई याच्यावर झडप घातली.

Illegal Weapons Seized Washim
Washim fire incident: घनकचरा विलगीकरण केंद्राला आग; ३६ लाखांचे नुकसान

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, खाकीचा हिसका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या शेतात लपवून ठेवलेल्या दोन धारदार तलवारी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. पंचांसमोर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी गणेश रामराव मुके (वय २८ वर्षे) याच्यावर वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अगरवाल आणि पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वाखाली निलेश जाधव व त्यांच्या पथकाने यशस्वी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news