Washim fire incident: घनकचरा विलगीकरण केंद्राला आग; ३६ लाखांचे नुकसान

मुद्दाम आग लावल्याची शहर पोलिसांत तक्रार
Washim fire incident: घनकचरा विलगीकरण केंद्राला आग; ३६ लाखांचे नुकसान
Published on
Updated on

वाशिम : शहरातील डम्पिंग ग्राऊंड परिसरातील घनकचरा विलगीकरण व प्रक्रिया केंद्राला ७ मे रोजी आग लागून मोठ्या प्रमाणात वर्गीकृत सुका कचरा जळून खाक झाला. या आगीत सुमारे ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, काही व्यक्तींनी जाणूनबुजून आग लावल्याचा आरोप करत संबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणारी तक्रार घनकचरा विलगीकरण व प्रक्रिया केंद्राच्या वतीने ८ मे रोजी वाशिम शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, घनकचरा प्रकल्पात शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. मागील सहा महिन्यांपासून दररोज सुमारे दोन टन प्रमाणे वर्गीकृत सुका कचरा गोडाऊनबाहेरील सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्यात आला होता. या साठ्याचे एकूण प्रमाण सुमारे ३६० टन इतके होते. ७ मे रोजी डम्पिंग ग्राऊंड परिसरातील मिश्रित कचऱ्याला आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. त्यानंतर काही व्यक्तींनी चिथावणी देत वर्गीकृत सुक्या कचऱ्यालाही आग लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पर्यावरण प्रदूषण वाढण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news