Washim Crime | काटा येथील शाळेत अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन; शिक्षकाला ३ दिवसांची पोलिस कोठडी

वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात पॉक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
 police custody
Police Custody File Photo
Published on: 
Updated on: 

Washim School Teacher Arrested

वाशीम : काटा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ५६ वर्षीय शिक्षक दिलीप बोरकर यांच्याविरुद्ध वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात पॉक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिची मुलगी काटा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. मुलीने काही दिवसांपूर्वी आईला सांगितले होते की, शिक्षक दिलीप बोरकर हे अभ्यास शिकवण्याच्या निमित्ताने तिला आणि वर्गातील अन्य मुलींना मांडीवर बसवत होते. तसेच तिच्याशी अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचेही तिने सांगितले होते.

 police custody
Washim|वाशिममध्ये जि.प. शिक्षकावर चिमुकल्या विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप, POCSO अंतर्गत कारवाई

मात्र, त्यावेळी मुलीच्या आईने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी सकाळी मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. दुपारी सुमारे तीन वाजता शाळेतील शिक्षिका देशमुख यांनी मुलीच्या आईला फोन करून शाळेत बोलावून घेतले. आई शाळेत पोहोचली असता तेथे गावातील अनेक महिला आणि पीडित मुलींचे पालक उपस्थित होते.

यावेळी पालकांनी शिक्षक दिलीप बोरकर यांच्याकडे गैरवर्तनाबाबत विचारणा केली असता, त्यांनी माफी मागत यापुढे असे कृत्य करणार नसल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

 police custody
Washim News | 'दै. पुढारी’च्या वृत्ताची दखल; अवघ्या तीन तासांत वाशीम-अकोला महामार्गावरील वळण बंद; ग्रामस्थांना दिलासा

दरम्यान, संबंधित शिक्षकाने अन्य अल्पवयीन मुलींसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचे तपासात समोर येत असल्याची माहिती वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी दिली.

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षक दिलीप बोरकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो), २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोष सिद्ध झाल्यास आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news