Washim News | 'दै. पुढारी’च्या वृत्ताची दखल; अवघ्या तीन तासांत वाशीम-अकोला महामार्गावरील वळण बंद; ग्रामस्थांना दिलासा

दुभाजक तोडून तयार करण्यात आलेले अनधिकृत वळण अखेर प्रशासनाने तातडीने बंद केले
Washim News | 'दै. पुढारी’च्या वृत्ताची दखल; अवघ्या तीन तासांत वाशीम-अकोला महामार्गावरील वळण बंद; ग्रामस्थांना दिलासा
Pudhari
Published on: 
Updated on: 

Washim Akola Highway Turn Closed

वाशीम : वाशीम-अकोला महामार्गावरील दुभाजक तोडून तयार करण्यात आलेले अनधिकृत वळण अखेर प्रशासनाने तातडीने बंद केले. 'दै. ‘पुढारी’ने या धोकादायक वळणामुळे अपघाताचा धोका वाढल्याबाबत वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत परिवहन विभागाने अवघ्या तीन तासांत कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत वळण बंद केले.

वाशीम-अकोला महामार्गावर दुभाजक तोडून वाहनांना वळण्यासाठी अनधिकृत मार्ग तयार करण्यात आला होता. या मार्गामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी हे वळण तातडीने बंद करण्याची मागणी केली होती.

Washim News | 'दै. पुढारी’च्या वृत्ताची दखल; अवघ्या तीन तासांत वाशीम-अकोला महामार्गावरील वळण बंद; ग्रामस्थांना दिलासा
Washim faces water crisis- पावसाअभावी वाशीम जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट!

यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’ने नागरिकांची समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत वृत्त प्रसिद्ध केले. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन आणि परिवहन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. दुपारी १२.३३ वाजता जेसीबीच्या मदतीने अनधिकृत वळणाच्या ठिकाणी काँक्रीट मिश्रित पिल्लर उभारून मार्ग बंद करण्यात आला.

या कारवाईमुळे महामार्गावरील संभाव्य अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होणार असून, वाहतूक अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाने तत्परतेने केलेल्या कारवाईबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी दैनिक ‘पुढारी’च्या भूमिकेचेही कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news