Washim Crime | वाशिममध्ये अवैध सावकारीवर धाड; २ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

८८ किलो चांदीसह १३ लाखांची रोकड जप्त; सावकारी व्यवहारांशी संबंधित कागदपत्रेही ताब्यात
Moneylending Raid
Moneylending RaidPudhari
Published on: 
Updated on: 

Washim Illegal Moneylending Raid

वाशिम : वाशिम तालुक्यातील एका नागरिकाने सहकार विभागाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे सहकार व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत लाखाळा परिसरातील एका ठिकाणी धाड टाकली. ३० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १६ अन्वये करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये सुमारे २ कोटी रुपये किंमतीची ८८ किलो चांदी आणि १३ लाख ३०० रुपयांची रोख रक्कम असल्याचे प्रशासनाने सांगितले.

राजगाव (ता. जि. वाशिम) येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या शंकरबाबा रोड, लाखाळा परिसरात राहणाऱ्या प्रिया दौलतराव वायचाळ आणि अलका दौलतराव वायचाळ यांच्या ठिकाणी ही झडती घेण्यात आली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात चांदी व रोकड आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Moneylending Raid
Washim Crime | वाशिम हादरले : क्षुल्लक वादातून कुर्‍हाडीने घाव घालून पुतण्याकडून काकाचा खून

सावकारी व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे ताब्यात

कारवाईत रोख रक्कम व चांदीबरोबरच कथित अवैध सावकारी व्यवहारांशी संबंधित खरेदीखते, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, करारनामे, कोरे व निनावी धनादेश, कोरे बाँड तसेच सावकारी व्यवहारांच्या नोंदी असलेली रजिस्टर पुस्तके ताब्यात घेण्यात आली आहेत. या कागदपत्रांची सहकार विभागाकडून तपासणी सुरू आहे.

जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून संबंधित आर्थिक व्यवहारांची व्याप्ती तसेच त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास होण्याची शक्यता आहे. ८८ किलो चांदीसाठी निधीचा स्रोत काय होता आणि जप्त कागदपत्रांमध्ये कोणते व्यवहार नमूद आहेत, याबाबतही तपास यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे.

Moneylending Raid
Washim Crime |अश्लिल व्हिडीओ असलेली लिंकचा ‘क्यु आर’ कोड स्कॅनर चिकटवणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी!

दोन पथकांकडून कारवाई

ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे आणि अमरावती विभागाचे सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक माणिक लटपटे यांनी केली.

वाशिमचे सहायक निबंधक ईश्वर काबरा आणि मंगरूळपीरचे सहायक निबंधक पी. टी. सरकटे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी ही कारवाई केली. पथकात जी. एन. कुकडे, ए. बी. सावंत, एस. पी. सांगळे, रुबीया शेख, व्ही. आर. ढोबळे, भारती इंगळे, परेश राऊत आणि राजकुमार भगत यांचा समावेश होता. नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी सहायक निबंधक (प्रशासन) रवी आकुलवार आणि प्रतवार पर्यवेक्षक मारोती भेंडेकर यांनी सांभाळली.

Moneylending Raid
Washim Crime | सावत्र वडिलांकडून आई, मुलींना जीवे मारण्याची धमकी

गोपनीय तक्रारी करण्याचे आवाहन

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार विभागाच्या जिल्हा निबंधक (सावकारी) कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news