Washim Rain | वाशिममध्ये गारांसह मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन काही काळ विस्कळीत

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर बाजारपेठांमध्ये नागरिकांची धावपळ
Heavy Rainfall Washim
Heavy Rainfall WashimPudhari
Published on
Updated on

Heavy Rainfall Washim

वाशिम : हवामान विभागाने मागील तीन दिवसांपासून ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. त्या अंदाजानुसार आज (दि. ३ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास वाशीम शहरात अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसासोबत किरकोळ गारपीटही झाली.

अचानक बदललेल्या हवामानामुळे काही मिनिटांतच पावसाची तीव्रता वाढली आणि शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर बाजारपेठांमध्ये नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Heavy Rainfall Washim
Washim Heavy Rainfall | अतिवृष्टीचा फटका: आमदार प्रशासनाला घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दरम्यान, गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असून मोठ्या नुकसानीची भीती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news