GATE Exam Result 2026 | GATE परीक्षेत मानसीची उत्तुंग भरारी : ऑल इंडिया रँक १०

मानसीची १००० पैकी तब्बल ९५० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी
Mansi Lokakshi  GATE AIR 10
Mansi Lokakshi Pudhari
Published on
Updated on

Mansi Lokakshi GATE AIR 10

वाशीम : देशातील प्रतिष्ठित GATE परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात मानसी चंद्रकांत लोकाक्षी हिने दैदिप्यमान यश संपादन करत ऑल इंडिया रँक १० पटकावला आहे. मानसीने १००० पैकी तब्बल ९५० गुण मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या यशामुळे मानसीसमोर देशातील नामांकित संस्थांचे दरवाजे खुले झाले. Indian Institute of Technology Madras, Indian Institute of Science Bangalore तसेच Indian Institute of Technology Bombay या अग्रगण्य संस्थांकडून तिला प्रवेशासाठी निमंत्रणे मिळाली होती. त्यापैकी मानसीने Indian Institute of Technology Bombay येथे एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) या शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Mansi Lokakshi  GATE AIR 10
Washim news: लग्नमंडपातून थेट परीक्षेला हजेरी; नववधू वैष्णवी काळेने दिले शिक्षणाला प्राधान्य

मानसीने आपले बी.टेक शिक्षण नागपूर येथील G H Raisoni College of Engineering मधून पूर्ण केले आहे. ती वाशीम येथील एस.एम.सी. इंग्लिश स्कूलमधील राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक व मास्टर ट्रेनर अभिजीत मुकुंदराव जोशी यांची भाची आहे.

मानसीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि स्थानिक स्तरावरून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news