

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजाराने वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. आज वाशीम शहरातील जवाहर कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघाली. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. वाशीम येथील मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये पाटणी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (MLA Rajendra Patni)
यावेळी वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी एस बुवणेश्वरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, जि. प. मुख्याधिकारी वैभव वाघमारे, न.प.मुख्याधिकारी निलेश गायकवाड, तहसीलदार पळसकर, खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक यांच्यासह सर्वपक्षीय आमदार आणि कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.(MLA Rajendra Patni)
आमदार पाटणी यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पाटणी यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू केला. १९९७ ते २००३ या कालावधीत ते शिवसेनेकडून विधान परिषद सदस्य होते. तसेच २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून विजयी झाले होते. २००९ साली त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर त्यांनी २०१४ च्या विधानसभा पाटणी यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू केला. १९९७ ते २००३ या कालावधीत ते शिवसेनेकडून विधान परिषद सदस्य होते. तसेच २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून विजयी झाले होते. २००९ साली त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले. मृदू स्वभावाचे, अभ्यासू आमदार अशी त्यांची ख्याती होती. सभागृहात त्यांनी अनेक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाय सुचवले होते. सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. (MLA Rajendra Patni)