Washim Fodder Ban | चारा बंदीचा आदेश कागदावरच; शेलूबाजारातून कुटाराची खुलेआम वाहतूक

कुटाराच्या गाड्यांना अभय कुणाचे? जिल्ह्यात चारा टंचाईची भीती!
Shelubazar Illegal Fodder Transportation
Shelubazar Illegal Fodder TransportationPudhari
Published on: 
Updated on: 

Shelubazar Illegal Fodder Transportation

वाशीम : जिल्ह्यातील चारा टंचाई लक्षात घेता चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र, या आदेशाला हरताळ फासत शेलूबाजार येथून सोयाबीन कुटाराची खुलेआम अकोला व यवतमाळ जिल्ह्याच्या दिशेने वाहतूक सुरू असल्याचे पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे, स्थानिक वाहतूक पोलिस चौकीसमोरूनच ही वाहने जात असल्याने प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील नुकसान आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. उपलब्ध चारा जपून वापरण्याची वेळ शेतकरी आणि पशुपालकांवर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारा बाहेर जाऊ नये, यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत; मात्र शेलूबाजारच्या मुख्य चौकातून भर दिवसा सोयाबीन कुटाराने भरलेली वाहने अकोला व यवतमाळ जिल्ह्याच्या दिशेने जात आहेत. ही वाहने वाहतूक पोलिस चौकीसमोरून जात असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने निर्बंधांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Shelubazar Illegal Fodder Transportation
Washim News | विहिरीत बुडालेल्या दोन मजुरांचे मृतदेह तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर!

जबाबदारी नेमकी कोणाची? संभ्रम कायम!

चारा वाहतूक रोखण्याची जबाबदारी महसूल विभागाची की पोलीस विभागाची, याबाबतही संभ्रम असल्याचे चित्र आहे. एकीकडे पशुपालक चाऱ्यासाठी चिंतेत असताना दुसरीकडे चारा जिल्ह्याबाहेर जात असेल, तर बंदी आदेशाचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित विभागांनी समन्वय साधून अशा वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ओव्हरलोड ट्रकमधून कुटाराची वाहतूक!

सोयाबीन कुटाराने क्षमतेपेक्षा अधिक भरलेले ट्रक शेलूबाजारातून अकोला जिल्ह्याच्या दिशेने जात आहेत. ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढत असून, संबंधित यंत्रणांनी याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सोयाबीन कुटाराची वाहतूक सुरू असताना कुठेही अटकाव अथवा कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.