Washim fake liquor seizure|वाशिममध्ये बनावट देशी-विदेशी दारूचा साठा जप्त! २८ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची धडक कारवाई
Washim fake liquor seizure
Washim fake liquor seizure
Published on: 
Updated on: 

वाशिम : वाशिम जिल्ह्यात बनावट देशी-विदेशी दारूची वाहतूक व साठवणूक होत असल्याच्या संशयावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. वाशिम तालुक्यातील अडोळी ते कुमारखेड रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बनावट देशी-विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. एकूण २८ लाख २८ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २० ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी केली असता, बनावट विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक आणि वाहतुकीच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विदेशी मद्याच्या बाटल्या आणि बनावट देशी दारू जप्त

कारवाईदरम्यान १८० मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ३२९ बाटल्या, इम्पीरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या १३८ बनावट सिलबंद बाटल्या तसेच बनावट देशी दारू भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ९० मिली क्षमतेच्या एक हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय देशी-विदेशी मद्याच्या साठ्याशी संबंधित अन्य मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी वैभव बाबन काकडे (वय २७ वर्षे), अमोल प्रल्हाद काकडे (वय २६ वर्षे) आणि रवी मानिक काकडे (वय ३१ वर्षे), सर्व रा. टो, ता. जि. वाशिम, यांना अटक करण्यात आली. आरोपींना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, वाशिम यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पीसीआर मंजूर केल्याचे विभागाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.

भरारी पथकाची संयुक्त कारवाई

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वाशिम भरारी पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भरारी पथकातील निरीक्षक एम. के. उईके, एम. एस. जाधव, दुय्यम निरीक्षक आर. पी. मनवर यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Washim fake liquor seizure
Washim Drought | वाशिम जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा संत्रा बागांना; ७५ टक्के फळे परिपक्व होण्यापूर्वीच तोडण्याची वेळ

या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मधुकर उईके करीत आहेत. अवैध मद्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक किंवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.

Washim fake liquor seizure
Washim News | वाशिम जिल्हा कृषी कार्यालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप!
logo
Pudhari News
pudhari.news