Extortion Case
Extortion CasePudhari

Washim Crime | खंडणीखोर हरीश सारडा विरोधात माजी जि.प. सदस्य पांडुरंग ठाकरे यांची तक्रार

जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्याकडे निवेदन; शहरातील व्यापारी व नागरिकांना त्रास देण्याचा आरोप
Published on

Harish Sarda Extortion Case

वाशिम: शहरातील कुख्यात खंडणीखोर म्हणून ओळख असलेल्या हरीश सारडा यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे शहरात पुन्हा एकदा खंडणीप्रकरणी चर्चा रंगली आहे.

सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, हरीश सारडा व त्यांच्या साथीदारांकडून शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय व्यक्तींना वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दारूच्या नशेत फोन करून शिवीगाळ करणे, धमक्या देणे तसेच सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.

Extortion Case
Washim Crime | किरकोळ वादातून युवकावर प्राणघातक हल्ला; पिस्तूल रोखून खंजर व लोखंडी रॉडने मारहाण

तसेच कोणत्याही ठोस कारणाशिवाय विविध शासकीय कार्यालयांमध्ये तक्रारी करून नागरिक व व्यापाऱ्यांना अडचणीत आणले जात असून, त्यातून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news