Washim News | वाशिम जिल्ह्यात सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी; ३ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात शस्त्रे, लाठ्या, काठ्या, तलवारी, भाले, बंदुका तसेच इजा करण्यास सक्षम तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगण्यास मनाई
जमावबंदी, Prohibition applies
जमावबंदी लागू Pudhari News Network
Published on
Updated on

Washim Prohibition of Assembly

वाशिम : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये संपूर्ण वाशिम जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश दि. ३ एप्रिल २०२६ पर्यंत प्रभावीपणे लागू राहणार आहेत.

जिल्ह्यात दि. २६ मार्च रोजी श्री रामनवमी, दि. ३१ मार्च रोजी भगवान महावीर जयंती तसेच दि. २ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. याशिवाय श्री क्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा) येथे २६ मार्चपर्यंत भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

जमावबंदी, Prohibition applies
Washim News | एकबुर्जी धरण परिसरात अनधिकृत पाणी उपशावर मोठी कारवाई; विद्युत पंप जप्त

काय मनाई?

या आदेशानुसार जिल्ह्यात शस्त्रे, लाठ्या, काठ्या, तलवारी, भाले, बंदुका तसेच इजा करण्यास सक्षम तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच स्फोटक किंवा दाहक पदार्थ वाहून नेणे, दगडफेक किंवा क्षेपणास्त्रांसाठी साधने जमा करणे, बिभत्स प्रदर्शन करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक घोषणा देणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, अशांतता निर्माण करणारे कृत्य करणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे किंवा मिरवणुका काढणे यावरही मनाई करण्यात आली आहे.

जमावबंदी, Prohibition applies
Washim News | वाशिम शहरात प्लास्टिक पिशवीचा वापर वाढला, नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

सवलती कुणाला?

कामावर असलेले पोलीस अधिकारी व शासकीय/निमशासकीय कर्मचारी, तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी असलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करत शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news