Washim News | वाशिम शहरात प्लास्टिक पिशवीचा वापर वाढला, नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

राज्य शासनाने आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे
Washim Plastic bag ban violation
Washim Municipal Council Pudhari
Published on
Updated on

Washim Plastic bag ban violation

वाशिम : राज्य शासनाने आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही जिल्ह्यात व शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे.तर यामुळे पशु व गुरांच्या जीवितला धोका निर्माण होत आहे, या पिशव्याचा वापर सर्वत्र दिसत असून आठवडी बाजारात सर्वच ठिकाणी याच्या वापरामध्ये चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसून येते.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सर्वाधिक प्रतिबंधित पिशव्या दिसून येत असल्याने प्लास्टिक बंदीचे काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे वाशिम शहरात कुठेही हातात कॅरिबॅग घेऊन फिरा कोणीही कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लहान, मोठे व्यावसायिकही आता बिनधास्त झाले आहेत.

Washim Plastic bag ban violation
Washim News | राजू पाटील राजे यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी; माळी समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वाशिम नगर परिषदेच्या वतीने मागील वर्षापूर्वी कारवाई करून सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी आणली होती. काही ठिकाणी प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाईही केली होती. पण ही कारवाई आता थंडावल्याने प्लास्टिक विक्रीनेही जोर पकडला आहे.

विशेषतः आठवडी बाजार,गुरुवार बाजार,बसस्थानक परिसरात भाजी बाजारामध्ये तसेच मटण मार्केट मध्ये, नास्त्यांच्या दुकानात, स्टेशनरी मध्ये सुद्धा प्लास्टिक पिशव्याचा सर्रास वापर वाढला आहे. यावर नगर परिषद प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.तर दुसरी कडे मार्च एंडिंगच्या नावाखाली नगर परिषद कडून शहरात सर्व कारवाई शून्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news