Washim development projects 2026 : कोट्यवधींच्या विकासकामांतून बदलतोय वाशीम जिल्ह्याचा चेहरा-मोहरा

शहराच्या सौंदर्यीकरणालाही मिळतेय नवी झळाळी
Washim development projects 2026 : कोट्यवधींच्या विकासकामांतून बदलतोय वाशीम जिल्ह्याचा चेहरा-मोहरा
Published on
Updated on

अजय ढवळे

वाशीम : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा, नवा वेग आणि नवी ओळख देण्याचे काम पालकमंत्री दत्तात्रय भरने मामा यांच्या पुढाकारातून आणि विशेष प्रयत्नांतून सुरू झाले आहे. पालकमंत्र्यांच्या विकासदृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांना चालना मिळाली असून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, सार्वजनिक बांधकामे, समाजमंदिरे, मूलभूत सुविधा यांसोबतच वाशीम शहराच्या सौंदर्यीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. विकासासोबतच शहर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि आधुनिक करण्याचा पालकमंत्री भरने मामा यांचा प्रयत्न असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Washim development projects 2026 : कोट्यवधींच्या विकासकामांतून बदलतोय वाशीम जिल्ह्याचा चेहरा-मोहरा
Washim Samruddhi Expressway Parking Scam|वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर पार्किंगच्या नावाखाली अवैध वसुली!

वाशीम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टेम्पल गार्डन, अकोला नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण तसेच पोलीस स्टेशनसमोरील दुभाजकाचे सौंदर्यीकरण अशा विविध महत्त्वपूर्ण कामांना पालकमंत्री दत्तात्रय भरने मामा यांनी विशेष प्राधान्य दिले आहे. ही कामे केवळ सौंदर्यीकरणापुरती मर्यादित न राहता वाशीम शहराच्या बदलत्या विकासाचे प्रतीक ठरणार आहेत.

“विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत,” या स्पष्ट भूमिकेतून संबंधित विभागांना कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, १५ ऑगस्टपूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणांना लवकरच आकर्षक व आधुनिक स्वरूप प्राप्त होणार आहे.

Washim development projects 2026 : कोट्यवधींच्या विकासकामांतून बदलतोय वाशीम जिल्ह्याचा चेहरा-मोहरा
Washim news: वाशिम शहराच्या सौंदर्यीकरणाला वेग; नगर परिषदेची विकासकामे प्रगतीपथावर...

पालकमंत्री दत्तात्रय भरने मामा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, विकासकामांबाबतची सकारात्मक भूमिका आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना आता प्रत्यक्ष गती मिळत आहे. निधी उपलब्ध करून देण्यासोबतच कामांची प्रगती आणि त्यांची अंमलबजावणी याकडेही लक्ष दिले जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील गावागावांत विकासाची नवी पहाट उगवत असून, वाशीमच्या विकासाला केवळ निधीची साथ नाही, तर सक्षम नेतृत्वाची दिशा मिळत आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कामांना प्राधान्य मिळत असल्याने या विकासाचा थेट फायदा जनतेला होत आहे.वाशीम शहराच्या विकासाला आधुनिकतेची जोड देत “सुंदर वाशीम – विकसित वाशीम” या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. शहरातील प्रमुख चौकांचे रूपडे बदलण्याबरोबरच जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठी भर पडत आहे.

Washim development projects 2026 : कोट्यवधींच्या विकासकामांतून बदलतोय वाशीम जिल्ह्याचा चेहरा-मोहरा
Washim Cattle Thieves | आंतरजिल्हा जनावरे चोरणारी टोळी जेरबंद; पाच बकऱ्यांसह ७.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पालकमंत्री दत्तात्रय भरने मामा यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या तत्परतेमुळे वाशीम जिल्हा विकासाच्या नव्या पर्वाकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. “निधीचा वर्षाव… विकासाचा धडाका… सौंदर्यीकरणाला नवी झळाळी… आणि पालकमंत्री भरने मामा यांच्या नेतृत्वात बदलतोय आपला वाशीम!” अशी सकारात्मक चर्चा सध्या जिल्हाभर ऐकायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news