Washim Cattle Thieves | आंतरजिल्हा जनावरे चोरणारी टोळी जेरबंद; पाच बकऱ्यांसह ७.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मानोरा पोलिसांची मोठी कारवाई; चार आरोपी अटकेत
Manora Police Cattle Thieves Arrested
Manora Police Cattle Thieves Arrested Pudhari
Published on
Updated on

Manora Police Cattle Thieves Arrested

वाशीम : विविध जिल्ह्यांतून जनावरे चोरी करून त्यांची परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा मानोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी एर्टिगा कार असा एकूण ७ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मानोरा पोलिस ठाण्यात बकरी चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. ग्राम पारवा येथून बकऱ्या चोरीला गेल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. फुटेजमध्ये चोरीसाठी वापरलेली सुझुकी एर्टिगा कार दिसून आली होती. या वाहनाचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत सदर वाहन ब्राम्हणगाव, ता. पुसद येथील सतीश भारत श्रृंगारे याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Manora Police Cattle Thieves Arrested
Washim News : जुन्या वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला ५ वर्षे सश्रम कारावास

त्यानुसार पोलिसांनी सतीश श्रृंगारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार करण विनोद राठोड, प्रथमेश दिलीप पवार आणि तुषार किशोर जाधव यांची नावे सांगितली. पोलिसांनी चौघांना अटक केली. प्रथमेश पवार याच्या घराची झडती घेतली असता पाच बकऱ्या आढळून आल्या.

चौकशीत यापैकी तीन बकऱ्या देउरवाडी येथून, तर दोन बकऱ्या पारवा येथून चोरी केल्याचे आरोपींनी सांगितले. पारवा येथील ज्ञानेश्वर सुखदेव राठोड यांच्या तीन बकऱ्यांपैकी दोन आणि देउरवाडी येथील महादेव श्रावण शिंदे यांच्या तीन बकऱ्या पोलिसांनी हस्तगत केल्या. जप्त केलेल्या पाच बकऱ्यांची किंमत सुमारे ४९ हजार रुपये आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली एमएच-२९ सीजे-०९३८ क्रमांकाची एर्टिगा कार, किंमत सुमारे सात लाख रुपये, जप्त करण्यात आली.

Manora Police Cattle Thieves Arrested
Washim news: अनसिंग बसस्थानकासमोर पाऊसाच्या पाण्याचे झाले ‘तळे'! प्रवाशांचे हाल

आरोपींनी आणखी जनावरे चोरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, नागरिकांनी जनावरे चोरीला गेली असल्यास मानोरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि दिनकर राठोड करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलिस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नैना पोहेकर व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news