Washim mobile Theft : परभणीचा अट्टल मोबाईल चोरटा मालेगाव तालुक्यातून गजाआड

परभणीतील या आरोपीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत
Mobile Theft
Mobile Theft
Published on
Updated on

वाशिम : रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल चोरून ते ग्रामीण भागात कमी किमतीत विकणाऱ्या परभणी जिल्ह्यातील एका अट्टल चोरट्याला मालेगाव पोलिसांनी मेडशी (जिल्हा. वाशिम) येथे सापळा रचून अटक केली. किशनलाल शंकरलाल तापडिया (वय ४० वर्षे, रा. चाटोरी, ता. पालम, जि. परभणी) असे या परभणीतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई ३० जून रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील रहिवासी असलेला किशनलाल तापडिया हा मेडशी गावात संशयास्पदरीत्या फिरत असून तो कोणतीही पावती किंवा बिल नसलेले मोबाईल अत्यंत कमी किमतीत विकत असल्याची गुप्त माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने मेडशी येथे जाऊन संशयित किशनलाल तापडिया याला ताब्यात घेतले.

Mobile Theft
Calangute Police iPhone Thieves Arrested | कळंगुट येथे पर्यटकांचे महागडे मोबाईल लंपास करणारे जेरबंद

पोलिसांनी त्याच्या पाठीवरील बॅगची झडती घेतली असता, त्यात विविध नामांकित कंपन्यांचे १८ महागडे मोबाईल मिळून आले. या मोबाईलबाबत पोलिसांनी आरोपीकडे वैध कागदपत्रांची मागणी केली असता, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.

रेल्वेतील प्रवाशांना बनवायचा टार्गेट

परभणीच्या या आरोपीची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने हे सर्व मोबाईल रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे चोरल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलच्या आयएमईआय (IMEI) क्रमांकावरून तपास केला असता, त्यातील एक मोबाईल भुसावळ जीआरपी (लोहमार्ग) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ४३८/२०२६ मधील चोरीचा असल्याचे उघड झाले. परभणीतील या आरोपीच्या इतर चोऱ्यांचा माग काढण्यासाठी मालेगाव पोलिसांनी भुसावळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आहे. परभणी येथील आरोपी किशनलाल तापडिया याच्याविरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात अप क्रमांक ४४३/२०२६ नुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Mobile Theft
Washim Crime | वाशिम शहरात सीसीटीव्हीत चेहरा लपवणारा 'कंबलवाला' अखेर जेरबंद; 7 दुकान फोडीची कबुली

पोलीस पथकाची कामगिरी

सदरची धडक कारवाई वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड , उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनात मालेगावचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार, पोलीस हवालदार सुनील पवार, मनीष राठोड, शिवाजी काळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार आणि वैभव झरकर यांच्या पथकाने केली आहे. परभणीतील या आरोपीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news