Washim Crime: कॉल रिकॉर्डिंगची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; किराणा दुकानदाराविरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा

अल्पवीय मुलगी गर्भवती राहिली; मनाविरूद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची केली तक्रार
Girl Molestation
Girl Molestationfile photo
Published on: 
Updated on: 

वाशीम दि. २६: अजय ढवळे

कारंजा लाड शहरातील एका अल्पवयीन मुलीला फोन कॉल रेकॉर्डिंगच्या बहाण्याने धमकावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आणि तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी एका ४५ वर्षीय किराणा दुकानदाराविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल २०२३ ते जून २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Girl Molestation
Washim Crime | मालेगावात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक; चौघांवर गुन्हे

संशयिताचे किराणा दुकान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी याचे किराणा दुकान आहे. पीडित मुलीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिला दुकानात बोलावून घेतले. तिच्या फोनमधील कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे सांगून ते कुटुंबीयांना ऐकवण्याची धमकी दिली आणि तिला धमकावून तिच्यावर दबाव आणला.

Girl Molestation
Washim Crime | वाशिममध्ये अवैध सावकारीवर धाड; २ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मनाविरूद्ध शारीरिक संबंध

पीडिता अल्पवयीन असल्याची जाणीव असतानाही तिच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची तक्रार दाखल झाली आहे. एप्रिल २०२३ ते जून २०२६ या कालावधीत संशयिताने पीडितेला घरी तसेच किराणा दुकानात बोलावून हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Girl Molestation
Washim Crime | वाशिम हादरले : क्षुल्लक वादातून कुर्‍हाडीने घाव घालून पुतण्याकडून काकाचा खून

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी कारंजा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एल), ६४(२)(एम), ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पठाण पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news