Washim Theft | पोलीस चौकीजवळच सोमानी टेलिकॉमच्या गोडाऊनवर डल्ला; ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास

शटर तोडून सिगारेटची चोरी; पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळविला
Washim Somani Telecom Theft
Washim Somani Telecom TheftPudhari
Published on: 
Updated on: 

Washim Somani Telecom Theft

वाशिम : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोलीस चौकीला लागून असलेल्या सोमानी टेलिकॉमच्या सिगारेट एजन्सीच्या गोडाऊनवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. गोडाऊनचे लॉक आणि शटर तोडून चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सिगारेटसह सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही सोबत नेला. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सोमानी टेलिकॉमची सिगारेट एजन्सी असून, या एजन्सीच्या गोडाऊनला चोरट्यांनी लक्ष्य केले. रात्री साडेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे लॉक आणि शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर विविध कंपन्यांच्या सिगारेट आणि इतर साहित्य चारचाकी वाहनांमध्ये भरून घटनास्थळावरून पलायन केले. जाताना चोरट्यांनी गोडाऊनमधील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही काढून नेला.

Washim Somani Telecom Theft
Washim Crime News: वाशिम हादरले! चारित्र्याच्या संशयातून झोपलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला

सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आले असता शटर तुटलेले आणि गोडाऊनमधील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सिगारेट आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. तसेच परिसरातील अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू केले आहे.

Washim Somani Telecom Theft
Washim News: दुष्काळाच्या झळांनी हताश शेतकऱ्याने उभ्या केळीच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर

दरम्यान, पोलीस चौकीच्या अगदी जवळच चोरीची घटना घडल्याने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी शेजारील पोलीस चौकीत कर्मचारी उपस्थित नसल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने व्यापारी प्रतिष्ठाने आणि गोडाऊनच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी पोलीस चौकीत नियमित कर्मचारी तैनात ठेवावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. या धाडसी चोरीचा तपास लावून आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.