Akola Zone Solar Energy | अकोला परिमंडळात १०८ सौर प्रकल्प कार्यान्वित; १.११ लाख शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा

महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांची माहिती
Solar Power For Farmers
Solar Power For FarmersAI Photo
Published on
Updated on

Solar Power For Farmers

वाशीम : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत अकोला परिमंडळात विकेंद्रित सौर प्रकल्पांच्या उभारणीला वेग आला आहे. परिमंडळात आतापर्यंत १०८ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यांची एकूण क्षमता ४४९ मेगावॅट आहे. या प्रकल्पांमुळे अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील १ लाख ११ हजार १४५ शेतकरी ग्राहकांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी दिली.

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत महावितरणच्या ३३ केव्ही क्षमतेच्या १७४ उपकेंद्रांसाठी २०६ ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमधून एकूण ७५६ मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Solar Power For Farmers
Washim RTE news: आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील खासगी शाळांचे शासनाकडे शुल्क प्रतिपूर्ती तब्बल २० कोटी रुपये थकीत...

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. अकोला परिमंडळातील निर्धारित उद्दिष्टापैकी सुमारे ६० टक्के म्हणजेच ४४९ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांतून निर्माण होणारी सौर ऊर्जा जवळच्या उपकेंद्रांमार्फत थेट शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिली जात आहे.

दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतात जाण्याची गरज कमी झाली आहे. तसेच दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने पीक पद्धतीतही सकारात्मक बदल होत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

Solar Power For Farmers
Washim news: वाशिम शहराच्या सौंदर्यीकरणाला वेग; नगर परिषदेची विकासकामे प्रगतीपथावर...

जिल्हानिहाय प्रगती

अकोला : जिल्ह्यात ७३ ठिकाणी २४७ मेगावॅटचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी ४४ ठिकाणी सौर प्रकल्प कार्यान्वित झाले असून, १९० मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. याचा लाभ ५० हजार ५२ शेतकऱ्यांना मिळत आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात ८२ ठिकाणी ३३९ मेगावॅटचे लक्ष्य असून, ३४ ठिकाणी १३६ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यामुळे २६ हजार ८४९ शेतकरी ग्राहकांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.

Solar Power For Farmers
Washim News : जुन्या वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला ५ वर्षे सश्रम कारावास

वाशीम : जिल्ह्यात ५१ ठिकाणी १७० मेगावॅटचे लक्ष्य आहे. त्यापैकी ३० ठिकाणी १२३ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामुळे ३४ हजार २४४ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ मिळत आहे.

उर्वरित सौर प्रकल्पांचे कामही वेगाने पूर्ण करून परिमंडळातील सर्व पात्र शेतकरी ग्राहकांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा महावितरणचा प्रयत्न सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news