Washim Accident | वाशीम - अकोला रोडवर भीषण अपघात; तरुणी जागीच ठार, तरुण गंभीर जखमी

सावरगावजवळ चारचाकी दुचाकीचा भीषण अपघात
 Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

.Washim Akola Road Accident

वाशीम : वाशीम-अकोला रोडवरील सावरगाव परिसरात शनिवारी (दि.२९) दुपारी २.३० च्या दरम्यान चारचाकी वाहन (क्रमांक एम एच ३७ ए एच २२६९) व एक दुचाकी आडवी आल्याने भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात ऋतुजा बालाजी गोटे (वय १९, रा. विनायक नगर, वाशीम) हिचा जागीच मृत्यू झाला.

तर ज्ञानेश्वर लादे (वय २०, रा. वसारी) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

अपघात नेमका कसा घडला, कोणत्या वाहनांचा सहभाग होता आणि त्यामागील कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 Accident News
Washim News | नेपाळमध्ये अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील पर्यटकांनी आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

दरम्यान, वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्याकडून अपघाताबाबत अधिकृत माहिती घेण्यात येत असून, पुढील तपशील मिळाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेचा पुढील तपास वाशीम ग्रामीण पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news