Washim faces water crisis- पावसाअभावी वाशीम जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट!

Washim faces water crisis-जलसाठे घटण्याची चिंता; पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
Washim faces water crisis
Washim faces water crisis
Published on
Updated on

वाशीम - पावसाने गेल्या ४५ दिवसापासून पुन्हा एकदा दडी मारल्याने वाशीम जिल्ह्यावर संभाव्य जलसंकटाचे सावट गडद होत आहे. ऑगस्टनंतर पावसात मोठा खंड पडल्याने खरीप पिकांसोबतच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक भागांत २० दिवसांहून अधिक पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. विदर्भातीलही अनेक तालुके त्याच्या परिणामांना सामोरे जात आहेत.

वाशीम जिल्ह्यातील परिस्थिती यापूर्वीच चिंताजनक राहिली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ६९ गावांमध्ये अधिकृत पाणीटंचाई निर्माण झाली होती. विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी खालावल्याने प्रशासनाला टँकर तसेच पर्यायी जलस्रोतांचा आधार घ्यावा लागला होता.

पावसाचा खंड ठरतोय धोक्याची घंटा

ऑगस्टमध्ये काही भागात पाऊस झाल्याने जलसाठ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्पांची पातळी अपेक्षित प्रमाणात वाढली नसल्याचे यापूर्वीच्या अहवालांतून समोर आले होते. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या एकबुर्जी प्रकल्पाच्या जलसाठ्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली होती.

जिल्ह्याचा सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ७९८.७ मिमी आहे. मात्र पावसाचे दिवस, त्यातील खंड आणि पावसाचे असमान वितरण यामुळे केवळ पावसाची एकूण आकडेवारी पुरेशी ठरत नाही. भूजलपातळी आणि जलसाठ्यांच्या पुनर्भरणासाठी दमदार व सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे.

शेतीपाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

पावसाचा खंड आणखी वाढल्यास त्याचा थेट परिणाम खरीप पिकांवर होण्याबरोबरच भूजलपातळीवरही होण्याची शक्यता आहे. विहिरी, बोअरवेल आणि हातपंपांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. ग्रामीण भागात जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.

Washim faces water crisis
Washim Money Lending | अवैध सावकारीप्रकरणी रुख्मिणी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल

प्रशासनासमोर नियोजनाचे आव्हान

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच गावनिहाय जलस्रोतांचा आढावा, उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन, बंद पडलेल्या जलस्रोतांची दुरुस्ती, विहिरींचे पुनर्भरण आणि आवश्यकतेनुसार टँकरचे नियोजन करण्याची गरज आहे. पावसाने आगामी काळात साथ दिली नाही, तर सध्याचे जलसाठे किती दिवस पुरतील, हा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे पाणी वाचवा, जलस्रोतांचे संवर्धन करा आणि संभाव्य टंचाईसाठी प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. “पाऊस आला तर संकट टळेल; मात्र पावसाने पुन्हा पाठ फिरवली तर जिल्ह्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

Washim faces water crisis
Dangerous turn on Washim-Akola Highway |वाशीम-अकोला महामार्गावर दुभाजक तोडून बनवले जीवघेणे वळण, रस्ता तत्काळ बंद करण्याची मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news