Washim|अपघातातील जखमीचा मृत्यू; दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले!

washim | ११ दिवस उलटूनही अज्ञात वाहनचालकाचा शोध नाही; वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी
Washim
सतीश सुपाजी कंकाळpudhari photo
Published on: 
Updated on: 

वाशिम : अपघातात गंभीर जखमी झालेले दापुरी खुर्द येथील सतीश सुपाजी कंकाळ (वय ३२) यांचा १९ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मालेगाव-रिसोड मार्गावरील किन्ही घोडमोड फाट्याजवळ १० ऑक्टोबर रोजी त्यांचा अपघात झाला होता. नारायण त्र्यंबक इंगोले (वय ६०, रा. दापुरी खुर्द) हेही किरकोळ जखमी झाले होते. सतीश यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुलींवरील पितृछत्र हरपले आहे.

Washim
Washim News | वाशिम जिल्हा कृषी कार्यालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप!

या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अपघातानंतर ११ दिवस उलटूनही संबंधित वाहनचालकाचा शोध लागला नसल्याने मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी मृतदेहासह शिरपूर पोलीस ठाणे गाठून संबंधित वाहनचालकाला शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

नारायण त्र्यंबक इंगोले यांच्या कामासाठी डिझेल आणण्यास गेल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे अज्ञात वाहनचालकासह नारायण इंगोले यांचीही चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Washim
Washim Drought | वाशिम जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा संत्रा बागांना; ७५ टक्के फळे परिपक्व होण्यापूर्वीच तोडण्याची वेळ

पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी

घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे कंकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन लहान मुलींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी. मुलींच्या संगोपनासाठी आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news