Sanjay Deshmukh | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान; खा. संजय देशमुख यांच्या पंचनाम्याच्या सूचना

Washim News | खासदार संजय देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना
Sanjay Deshmukh
खासदार संजय देशमुख (Pudhari Photo)
Published on
Updated on

Unseasonal Rainfall Washim Summer Crop Damage

वाशिम : अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, हरभरा, मका, भाजीपाला यासारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधून नुकसानग्रस्त क्षेत्रात तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी. पंचनाम्यात कोणतीही दिरंगाई करू नये.

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे श्रम वाया जाऊ नयेत, यासाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा करू, परंतु त्याआधी प्रशासनाने तातडीने कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. मी स्वतः या विषयावर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधणार आहे. शेतकऱ्यांनी धीर न सोडता संयम ठेवावा. व प्रशासन आपल्यासोबत असून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Sanjay Deshmukh
Washim Unseasonal Rain | वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून काहीसा दिलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news