Risod Sandalwood Theft रिसोडमधील चंदन चोरीचे दोन गुन्हे उघड; तिघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची कारवाई; ९ किलो चंदनासह २७ हजारांचा मुद्देमाल जप्त
Washim Risod  Sandalwood Smuggling Case
Washim Risod Sandalwood Smuggling CasePudhari
Published on: 
Updated on: 

Washim Risod Sandalwood Smuggling Case

वाशिम : रिसोड शहरात झालेल्या चंदन चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिसोड येथील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचे ९ किलो चंदन जप्त करण्यात आले आहे. जप्त चंदनाची किंमत २७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी गजानन नागाप्पा माळेकर यांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलीस ठाण्यात चंदन चोरीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या.

Washim Risod  Sandalwood Smuggling Case
Washim Crime | वाशीममध्ये पोलिसांची मोठी कारवाई! समृद्धी महामार्गावरून सुमारे २ कोटी रुपयांचा गांजा जप्त!

या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर सलमान खान अजिज खान (वय ३५), शेख चंदन शेर नुर मोहम्मद (वय ३८) आणि अब्दुल रहीम अब्दुल रज्जाक (वय ३७), तिघेही रा. रिसोड, यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी संबंधित दोन्ही गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष त्यांच्याकडून चोरीच्या चंदनाचे १६ लहान नग, एकूण वजन ९ किलो, जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत २७ हजार रुपये आहे.

या कारवाईमुळे रिसोडमधील चंदन चोरीच्या दोन्ही प्रकरणांचा तपास पुढे सरकला असून, या गुन्ह्यांचा पुढील तपास रिसोड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

या पथकाने केली कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर, दीपक घुगे आणि वाहनचालक सुनील तायडे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news