Washim Crime | वाशीममध्ये पोलिसांची मोठी कारवाई! समृद्धी महामार्गावरून सुमारे २ कोटी रुपयांचा गांजा जप्त!

दोन वेगवेगळ्या मोठ्या कारवाया, 300 किलो गांजा सापडला
Washim Crime | वाशीममध्ये पोलिसांची मोठी कारवाई! समृद्धी महामार्गावरून सुमारे २ कोटी रुपयांचा गांजा जप्त!
Washim Crime | वाशीममध्ये पोलिसांची मोठी कारवाई! समृद्धी महामार्गावरून सुमारे २ कोटी रुपयांचा गांजा जप्त!
Published on: 
Updated on: 

वाशीम : वाशीम जिल्ह्यात गांजाविरोधात पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान आज दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.पहिली कारवाई मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर करण्यात आली. पोलिसांचे पेट्रॉलिंग वाहन पाहून संशयित चालकाने पळ काढला. या वाहनाची झडती घेतली असता त्यात लपवून ठेवलेला गांजा आढळून आला.

दुसरी कारवाई कारंजा शहर पोलीस ठाण्यांतर्गत समृद्धी महामार्गावरच करण्यात आली. छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका आयशर ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमागे एक गुप्त केबिन बनवून गांजाची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.

एकूण जप्त गांजा: सुमारे ३०० ते ३५० किलो (पहिल्या कारवाईत १२० ते १५० किलो आणि दुसऱ्या कारवाईत १५० ते २०० किलो).

एकूण मुद्देमाल: वाहने आणि गांजा मिळून सुमारे २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एका गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास कारंजा शहर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.असल्याची माहिती वाशीम पोलीस अधीक्षक खाटमोडे-पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news